पुण्यनगरीत श्रीकृष्ण जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘ऑनलाईन’ कृष्णानंद सोहळा साजरा !
पुणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – वयस्कर असूनआजारपणात एकट्याने सर्व परिस्थिती हाताळणार्या, ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा अखंड भाव असणार्या, तसेच स्थिरताही हा स्थायीभाव असलेल्या श्रीमती उषा कुलकर्णी यांना सनातनच्या ११० व्या व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. यासमवेत शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेले अन् शस्त्रकर्म होतांना ईश्वराशी अखंड अनुसंधानात असणारे श्री. गजानन साठे हे १११ वे व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. या भावप्रसंगी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी पू. गजानन साठे यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. गजानन साठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
या वेळी पू. उषा कुलकर्णी यांची मुलगी पुणे जिल्ह्यात लेखाची सेवा करणार्या सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि जावई आधुनिक वैद्य (डॉ.) नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हे आणि अन्य नातेवाइकही सोहळ्यात सहभागी होते. या वेळी पू. गजानन साठे यांच्या पत्नी सौ. मंगला गजानन साठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि मुलगी सौ. अश्विनी देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) तसेच पू. गजानन साठे यांचे अन्य नातेवाइकही सोहळ्यात सहभागी होते.
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)