प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या नामजपादी उपायांच्या वेळी सौ. योया वाले यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे

उद्या श्रावण पौर्णिमा, म्हणजेच नारळी पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक (पू. (सौ.) माई)) यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. योया वाले यांना प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या नामजपादी उपायांच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

१. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी सुगंधाची अनुभूती येऊन मिळालेली पूर्वसूचना !

‘२.८.२०१८ या दिवशी सकाळी मी परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करत होते. थोड्या वेळाने मला चंदनाचा घमघमाट आणि आणखी एक सुगंध एकत्रितपणे येऊ लागला. त्या वेळी मला आठवले, ‘काही वर्षांपूर्वी मी प.पू. दास महाराज यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्याकडून असाच सुगंध येत होता.’ त्यामुळे ‘ते आश्रमात लवकरच रहायला येतील आणि सूक्ष्मातून ते आधीच आश्रमात आले आहेत’, असे मला जाणवले. नंतर काही दिवसांनी प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) आश्रमात आल्या. तेव्हाही मला तसाच सुगंध आला.

२. प.पू. दास महाराज यांच्या नामजपादी उपायांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. ‘साधकांचा त्रास लवकर न्यून व्हावा’, या तळमळीने आणि शरणागतभावाने नामजपादी उपाय करणार्‍या प.पू. दास महाराज यांच्यामुळे साधकांवर परिणामकारक उपाय होणे : आश्रमात आल्यावर प.पू. दास महाराज त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. त्या वेळी नामजपाला बसल्यावर मला आणि अन्य साधकांना पुष्कळ चैतन्य मिळते. प.पू. दास महाराज यांच्याकडे पाहिल्यावर मला जाणवते, ‘ते ईश्वराच्या अनुसंधानात असून ‘साधकांचा वाईट शक्तींचा त्रास  लवकर न्यून व्हावा’, या तळमळीने नामजप करत आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि त्यांचे (प.पू. दास महाराज यांचे) गुरु प.प. श्रीधरस्वामी हेच सर्वकाही करत आहेत’, असा त्यांचा अत्युच्च अव्यक्त भाव आहे. ते प्रत्येक गोष्ट शरणागतभावाने करतात.’

२ आ. प.पू. दास महाराज यांच्या नामजपादी उपायांमुळे त्रास वाढणे : या वेळी प.पू. दास महाराज यांचे उपाय मारक आणि निर्गुण-सगुण स्तरावरील होते. त्यांच्यातील चांगली शक्ती आणि वातावरणातील, तसेच साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध होत होते. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला प.पू. दास महाराज यांचे नामजपादी उपाय सहन होत नाहीत. प्रत्येक वेळी ते नामजपादी उपाय करत असतांना मला माझ्या छातीवर दाब जाणवतो.

३. त्रासाची तीव्रता वाढल्याने खोलीत जावे लागणे, ‘वाईट शक्तींनी विशुद्धचक्राच्या ठिकाणचा भाग दाबून धरला आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि पू. गाडगीळकाकांनी एक घंटा नामजपादी उपाय केल्यावर त्रास न्यून होणे

सौ. योया वाले

या वेळीही प.पू. दास महाराज करत असलेले नामजपादी उपाय मला सहन होत नव्हते. २० मिनिटांनंतर मला माझ्या त्रासांवर नियंत्रण ठेवता न आल्याने मी एका साधिकेच्या साहाय्याने खोलीत गेले. त्यानंतर माझा त्रास वाढल्यामुळे माझ्यासाठी नामजपादी उपाय करण्यासाठी पू. गाडगीळकाका (आताचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) आमच्या खोलीत आले. मी माझ्या खोलीत आले, तरी ‘माझ्यासाठी प.पू. दास महाराज नामजपादी उपाय अजूनही करतच आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले. ‘३ – ४ वाईट शक्तींना राग आला असून ‘माझा त्रास न्यून होऊ नये’, यासाठी त्यांनी माझ्या विशुद्धचक्राच्या ठिकाणचा भाग दाबून धरला आहे.’ पू. गाडगीळकाकांनी मला नामजप करायला सांगितला. मी जलद गतीने नामजप करू लागल्यावर हळूहळू माझा त्रास न्यून झाला.

४. नामजपादी उपायांच्या वेळी त्रासावर नियंत्रण न ठेवल्याने तो बाहेर पडून हलके वाटू लागणे

मला त्रास देणार्‍या वाईट शक्तींचा जोर पुष्कळ वाढल्याने या संदर्भात मी संतांकडून मार्गदर्शन घेतले. कालमाहात्म्यानुसार या वर्षीच्या अखेरपर्यंत (वर्ष २०१८ पर्यंत) वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांचा त्रास हळूहळू न्यून होणार आहे. आज नामजपादी उपायांच्या वेळी मी मला होणार्‍या त्रासावर नियंत्रण ठेवले नाही. परिणामी एवढे दिवस मला होणारा त्रास न्यून होऊन मला हलके वाटले.

वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या अनेक साधकांनाही अशाच प्रकारचे त्रास होत आहेत. वाईट शक्तींची शक्ती न्यून होत असल्याने त्या बलहीन होऊन शेवटी साधकांचा त्रास पूर्ण नाहीसा होणार आहे.’

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या नामजपादी उपायांच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१. पू. (सौ.) माई यांनी ‘मी नामजपादी उपाय करत नसून ईश्वरच साधकांसाठी उपाय करत आहे’, या भावाने नामजप करणे : त्याच दिवशी सायंकाळी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) यांच्या उपायांनाही मी बसले होते. त्या वेळी मला जाणवले की, ‘पू. माईंचे उपाय तारक आणि सगुण-निर्गुण स्तरावरील आहेत. ‘मी उपाय करत नसून ईश्वरच साधकांसाठी उपाय करत आहे’, असा त्यांचा भाव असून ‘साधकांना उपायांचा लाभ व्हावा’, अशी त्यांची तळमळ आहे.

२. ‘प.पू. दास महाराज गुरु आहेत’, असा शिष्यभाव असलेल्या पू. (सौ.) माई ! : पू. (सौ.) माई यांचा अहं अल्प असल्याने त्यांना जसे सांगितले आहे, तसे त्या करतात. ‘आदर्श आध्यात्मिक पत्नी कशी असावी’, याचे त्या उत्कृष्ट उदाहरण असून ‘प.पू. दास महाराज गुरु आहेत’, असा त्यांचा भाव आहे. एखाद्या शिष्याप्रमाणे त्या प.पू. दास महाराज यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन नम्रतेने अन् भावपूर्णतेने करतात.’

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक आणि प.पू. दास महाराज यांच्या उपायांच्या संदर्भात सौ. योया वाले यांना जाणवलेली सूत्रे

अनुभूती

टंकलेखन करतांना ‘आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे जाणवणे : ‘वरील अनुभूतींचे टंकलेखन करतांना मला सतत ढेकरा येत होत्या. ‘प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) माई यांच्या संदर्भातील सूत्रांचे टंकलेखन करतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. योया वाले (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्या साठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वी च्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.