वर्धिनी, तू एकरूप व्हावेस श्री गुरुचरणी ।

२१.७.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल यांचा २५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्त कु. सानिका योगेंद्र जोशी यांनी त्यांच्यावर केलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. वर्धिनी गोरल

एक आहे सखी । श्री गुरूंच्या सेवेतील तिचा भाव बघूया ।। १ ।।
मनमंदिरात ती बसवते । श्री गुरूंची मूर्ती ।। २ ।।

कु. सानिका जोशी

श्री गुरुचरणांवर वहाते ती निर्मळतेचे पाणी ।
निरागसतेच्या कापडाने पुसते श्री चरण ।। ३ ।।

आनंदाचे कुंकू ती लावते ।
अन् तत्त्वनिष्ठतेच्या अक्षता वहाते श्री चरणांवर ।। ४ ।।

भाव-भक्तीची माळ । ती श्री गुरूंना अर्पिते ।। ५ ।।

यांतून साधनेचा मेळ घालूनी । ती सेवेतला आनंद घेते ।। ६ ।।

सखे, आहेत तुझ्यात गुण अनेक ।
धरावीस कास तू व्यष्टी साधनेची ।। ७ ।।

स्वभावदोष आणि अहं यांवर मात करूनी ।
तू एकरूप व्हावेस श्री गुरुचरणी ।। ८ ।।

– कु. सानिका योगेंद्र जोशी (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक