प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

श्री. सुरेश चव्हाणके

काही मासांपूर्वी उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे २०० धर्मांधांनी यादव समाजातील लोकांवर हिंसक आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी महिलांवर बलात्कार करण्यापासून ते त्यांच्या हत्येपर्यंतचे सर्व प्रयत्न केले. त्याला ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) पत्रकारांनी मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण दिले. पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच छेडले आहे. भीतीमुळे गुलामी मानसिकता असलेल्या प्रसारमाध्यमांतील लोकांनी सेक्युलरवादाचा बुरखा घातला आहे. हा बुरखा हटवण्याची आवश्यकता आहे.