सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्‍या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाविषयी मला कोणताही खेद नाही.

या निर्णयामुळे माझ्यावर टीका केली जाईल, हे मला ठाऊक आहे. मी या सर्व टीका स्वीकारायला सिद्ध आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावण्यात आल्यावर बायडेन यांच्यावर टीका केली जात आहे. याविषयी ते बोलत होते.