कु. अंजली चिंतामणी मुजुमले हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळवले !
सातारा रस्ता, कात्रज (पुणे)- येथील कु. अंजली चिंतामणी मुजुमले हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळवले आहेत. ती समष्टी सेवा आणि व्यष्टी साधनाही करते. ती व्यष्टी साधनेच्या अंतर्गत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. सनातनचा कापूर अन् अत्तरही लावते. अभ्यासाला बसण्यापूर्वी प्रार्थना करून नामजपादी उपाय करून अभ्यास करते, तसेच अभ्यास झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करते. स्क्रीन शेअरींगची सेवाही ती भावपूर्ण आणि आनंदाने करते. ती नियमितपणे व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देते. मन एकाग्र होण्यासाठी तिने अथर्वशीर्षाचे पारायण केले. सत्संगाला जोडत असल्यामुळे इतरांकडून शिकायला मिळाले आणि स्थिर राहून अभ्यास करता आला, असे अंजलीने सांगितले.
कु. श्रावणी चिंतामणी मुजुमले हिने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८३.५० टक्के गुण मिळवले !
सातारा रस्ता, कात्रज (पुणे) – येथील कु. श्रावणी चिंतामणी मुजुमले हिने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८३.५० टक्के गुण मिळवले आहेत. ती व्यष्टी साधनेच्या अंतर्गत प्रार्थना, कृतज्ञता, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनच्या सारणी लिहते. सनातनचा कापूर आणि अत्तर यांचे उपाय तसेच नामजप करते. अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना करते आणि अभ्यासानंतर कृतज्ञता व्यक्त करते. या वर्षी शाळा महाविद्यालयाचा अभ्यास घरूनच करायचा होता; म्हणून थोडा ताण आला होता; पण नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले, असे श्रावणीने सांगितले.
कु. पार्थ सुनील सादिगले याने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले
हडपसर (पुणे) – येथील कुमार पार्थ सुनील सादिगले याने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती त्याचा पुष्कळ भाव आहे. त्याची आई (सौ. अनघा सादिगले) कुंभमेळ्याला सेवेला जातांना आणि गेल्यावर त्याने घरी पुष्कळ साहाय्य केले. आईला सेवा करता यावी यासाठी त्याला जमेल तेवढे सहकार्य करण्याचा तो प्रयत्न करतो.