केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

अपघातांमध्ये १ सहस्र ७६४ सैनिकांचा मृत्यू, तर ३२३ सैनिक हुतात्मा

  • एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !
  • मनोधैर्य अल्प असणारे सैनिक कधीतरी शत्रूशी लढू शकतील का ?

नवी देहली –  वर्ष २०१५ ते २०२० या काळात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सी.ए.पी.एफ्.च्या) ६८० सैनिकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. आत्महत्या केलेल्या सैनिकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सी.आर्.पी.एफ्.) आणि सीमा सुरक्षा दल (बी.एस्.एफ्.) यांच्या सैनिकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या अपघातांमध्ये १ सहस्र ७६४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती राय यांनी दिली. या कालावधीत विविध चकमकींमध्ये ३२३ सैनिक हुतात्माही झाले.

आत्महत्येमागे सर्वांत प्रमुख कारण हे कौटुंबिक असून आर्थिक विवंचना आणि आजारपण यांना कंटाळूनही काही सैनिकांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे.