चेन्नई येथे अवैधरित्या रहाणार्‍या इराणी मुसलमान टोळीकडून लूटमार !

बनावट आधार कार्ड जप्त

  • भारतात अवैधरित्या राहून लूटमार करेपर्यंत याची माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळत नाही, यावरून त्या झोपलेल्या आहेत, असेच समजायचे का ? अशी घटना देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर असून केंद्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे !
  • भारतीय नागरिकांना अनेक हेलपाटे घातल्यानंतर आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे आदी मिळतात; मात्र घुसखोरांना ते सहजरित्या कसे प्राप्त होते, याची चौकशी का केली जात नाही ?
  • आधीच भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मोठ्या प्रमाणात रहात असतांना इराणी मुसलमानही घुसखोरी करून वर गुन्हेगारी कारवाया करतात, यावरून भारत ही धर्मशाळा झाल्याचे अधिक स्पष्ट होते !

चेन्नई (तमिळनाडू) – पोलिसांनी येथे अवैधरित्या राहून लूटमार करणार्‍या ९ इराणी मुसलमान नागरिकांना अटक केली. यात ३ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्डही जप्त करण्यात आली आहेत. हे सर्वजण कोवलम् येथील एका रिसॉर्टमध्ये (सुट्टी घालवण्यासाठी किंवा करमणुकीसाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणी) अवैधरित्या थांबले होते. सोमालियाच्या एका नागरिकाला लुटण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असतांना या नागरिकांची माहिती पोलिसांना मिळाली. इराणी नागरिकांनी या नागरिकाला केंद्रीय पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडून २ लाख ८४ सहस्र रुपये लुटले होते. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी कह्यात घेतली आहे.

या इराणी नागरिकांच्या टोळीने यापूर्वी अनेक जणांना लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. याविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.