अफगाणिस्तानमध्ये सैनिक आणि तालिबानी यांच्यातील चकमकीत भारतीय वृत्तछायाचित्रकार ठार

वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये गेलेले दानिश सिद्दीकी हे भारतीय वृत्तछायाचित्रकार कंदहार येथील स्पिन बोल्डक परिसरात अफगाणी सैनिक आणि तालिबानी (‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिब’चा अर्थ ‘ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे आणि इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे.) आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी ठार झाले. सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. ते अफगाणिस्तानधील सध्याच्या घडामोडींची छायाचित्रे काढण्यास गेले होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य माघारी जात असल्यामुळे तालिबान्यांकडून मोठ्या प्रमाणात अफगाण सैन्यावर आक्रमणे केली जात आहेत.