इस्‍लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्‍ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

अनिल धीर

चीन धमकावण्‍याचे प्रकार करतो. भारताने लडाखमध्‍ये दाखवलेल्‍या सैन्‍यबळानंतर चीनला भारताची शक्‍ती समजलेली आहे. त्‍यामुळे तो नेपाळ आणि श्रीलंका यांना भारतापासून वेगळा करण्‍याचा प्रयत्न करत आहे; मात्र ते शक्‍य होणार नाही. नेपाळचे भारताशी सांस्‍कृतिक संबंध असल्‍याने नेपाळ-भारत मैत्री अबाधित राहील. चीनला भारताशी युद्ध महागात पडेल, हे त्‍यांना ठाऊक आहे. इस्‍लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल. श्रीलंकेसारखे देश चीनच्‍या षड्‍यंत्राला बळी पडत आहेत. भारतीय सैन्‍य जगातील कोणत्‍याही सैन्‍याच्‍या तोडीस तोड आहे. पाकिस्‍तानमध्‍ये कोणत्‍याही अडचणी आल्‍यास ते भारताला त्रास देतात. ही त्‍यांची नित्‍याची रणनीती आहे.