|
पोखरण (राजस्थान) – येथे सैन्यतळाला भाजी पुवणार्या हबीबुर्रहमान खान या ३४ वर्षीय व्यक्तीला हेरगिरी केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी अटक केली. हबीब खान पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पुरवत होता. त्याच्याकडून अत्यंत गोपनीय कागदपत्रे आणि सैन्यतळाचे रेखाचित्र जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगरा येथे तैनात असलेल्या परमजित कौर या सैनिकाने हबीब याला ही कागदपत्रे मिळवून दिल्याचे समोर आले आहे. हबीब ही माहिती कमल नावाच्या व्यक्तीकडे पाठवत होता. हबीबुर्रहमान पाकिस्तानलाही जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. (हबीबुर्रहमान पाकला जाऊन आला असतांनाही त्याला सैन्यतळासारख्या संवेदनशील ठिकाणी भाजी पुरवण्याचे कंत्राट कसे मिळाले ? याचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) हबीब खान याची चौकशी चालू असून त्यातून आणखीही काही संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे.
An investigation has revealed that the accused used to get sensitive documents from an Army official posted at the base camp. #pokhran #isi #armyhttps://t.co/KJjKIvdAtO
— India.com (@indiacom) July 15, 2021
हबीबुर्रहमान खान हा बिकानेरचा रहिवासी असून तो काही सामाजिक कार्यांतही सहभागी असतो. तो गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदार म्हणूनही काम करत आहे. पोखरणमध्ये सैन्यतळाच्या ‘इंदिरा किचन’ला भाजी पुरवण्याच्या कामाचे कंत्राट त्याला मिळाले होते.