आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत, हेही तितकेच खरे !

बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

हाजीपूर (बिहार) – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले.

खान यांनी म्हटले की, जयराम सिंह आणि भगवान सिंह हे दोन भाऊ आमचे पूर्वज होते. ते बैसवाडातून आले होते. दोघे कैमूर भागात स्थायिक झाले. लढाई चालू झाल्यानंतर भगवान सिंह यांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे भगवान सिंह यांच्या कुटुंबातील लोक मुसलमान आहेत; परंतु जयराम सिंह यांच्या वंशातील लोक आजही हिंदू आहेत. आमच्या कुटुंबातील अनेक लोक हिंदु राजपूत आहेत. हिंदु नातेवाइकांशी आजही सलोख्याचे संबंध आहेत. कुणाचेही बलपूर्वक धर्मांतर केले जाऊ शकत नाही. माझ्या डोक्यावर पिस्तुल लावले, तरी मी माझा धर्म पालटणार नाही. कुणी स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करत असेल तर गोष्ट वेगळी आहे; मात्र कुणावरही धर्मांतरासाठी बळाचा वापर राज्यशासन होऊ देणार नाही.