विनिपेग (कॅनडा) येथे संतप्त नागरिकांनी पाडले महाराणी व्हिक्टोरिया आणि एलिझाबेथ द्वितीय यांचे पुतळे !

कॅथॉलिक चर्चच्या शाळांनी धर्मांतरासह केलेल्या अत्याचारांमुळे मृत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांचे मृतदेह दफन केल्याचे प्रकरण

  • केवळ पुतळे पाडून होणार नाही, तर कॅथॉलिक चर्चकडून करण्यात येणार्‍या धर्मांतराला चाप बसणे आवश्यक आहे ! त्यासाठी अशा धर्मांतराच्या विरोधात असणार्‍या खिस्त्यांनी आणि त्यांच्या देशांनी संघटित होऊन कॅथॉलिक चर्च अन् ख्रिस्ती मिशनरी यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !
  • भारतातील ख्रिस्ती अशा धर्मांतराच्या विरोधात गप्प का ? कि कॅनडातील ख्रिस्त्यांपेक्षा त्यांना अधिक कळते ?
संतप्त नागरिकांनी पाडलेला महाराणी व्हिक्टोरिया यांचा पुतळा

विनिपेग (कॅनडा) – कॅनडातील कॅथॉलिक चर्चकडून गेल्या शतकात चालवल्या जाणार्‍या कॉन्व्हेंट शाळांच्या परिसरामध्ये सहस्रोंच्या संख्येने लहान मुलांचे मृतदेह दफन करण्यात आल्याचे काही आठवड्यांपूर्वी उघड झाल्यानंतर कॅनडामध्ये संतापाचे वातावरण आहे. दफन करण्यात आलेली मुले स्थानिक आदिवासी होते आणि त्यांना या शाळांत धर्मांतरासाठी बाध्य करण्याचा प्रयत्न करतांना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु ‘पोप फ्रन्सिस यांनी या प्रकरणी क्षमा मागावी’, असे आवाहनही केले होते. या पार्श्‍वभूमीवर विनिपेग शहरामध्ये संतप्त नागरिकांनी महाराणी व्हिक्टोरिया आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुतळे पाडून टाकले आहेत.