पूर्णत: लसीकरण झालेल्या आणि कोरोना चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्या ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

पणजी, २२ जून (वार्ता.) – कोरोना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आणि ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्यावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मी ही मागणी करणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे. मंत्री मायकल लोबो पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाने संचारबंदी हटवली आहे आणि काही प्रमाणात पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. ‘रेल्वेने गोव्यात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला आहे ना’, याची रेल्वे प्रशासनाने निश्‍चिती करावी. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने रेल्वे प्रशासनाला अधिकृतरित्या संपर्क साधणे आवश्यक आहे.’’