१४ ते १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, म्हणजे तब्बल ३५० वर्षे तुघलक, बहमनी, फरूकी, तसेच ५ पातशाह्या यांसारख्या इस्लामी राजवटी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत होते. हिंदु धर्मावर आलेली जिहादी छाया नष्ट करण्याचे दैवी कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून घडले. महाराजांनी महाराष्ट्रात शिवशाहीचे तोरण उभारत हिंदवी स्वराज्य उभारले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हाच तो दिवस जेव्हा हिंदूंचे सार्वभौमत्व सिद्ध झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जी आव्हाने होती, तशीच ती आज पुन्हा निर्माण झाली आहेत !
- ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु स्त्रियांचे जीवन केले जात आहे उद्ध्वस्त !
- लाखो हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे उघडपणे होत आहे धर्मांतर !
- काश्मीर, कैराना (उत्तरप्रदेश) यांसारख्या भागांतून हिंदूंना जीवाच्या भीतीने करावे लागत आहे पलायन !
- निरंकुश गोहत्येमुळे गायी फोडत आहेत हंबरडे !
- धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकारी यंत्रणा करत आहेत हिंदूंच्याच मंदिरांची लूट !
- शिक्षणव्यवस्थेद्वारे हिंदूंचा गौरवशाली इतिहास दडपून हिंदूंना बनवले जात आहे शौर्यहीन !
हिंदूंनो, हिंदु धर्मावरील या आणि अन्य सर्व आघातांवर एकच उपाय आहे अन् तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यासाठी आपल्यासमोर आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! आज आपण त्यांचे गुण अंगी बाणवून त्यांचा आदर्श ठेवून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापूया !!
संकलक : श्री. मिलिंद धर्माधिकारी, चिंचवड, पुणे.
वाचकांना निवेदन : नियमित प्रसिद्ध होणारे ‘नोंद’ सदर आज प्रसिद्ध केलेले नाही, याची नोंद घ्यावी.