मंत्रालयात नोकरी देण्याच्या निमित्ताने तरुणाची फसवणूक !

पुणे – मंत्रालयात महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावतो, असे आमीष दाखवून दोघांनी अकोला तालुक्यातील तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली. शेखर वाघमारे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितीन जोंधळे आणि विजयकुमार पाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.