महाबळेश्वर-पाचगणी खुले; मात्र प्रेक्षणीय स्थळे बंदच !


सातारा, २२ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे खुली झाली आहेत; मात्र महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. थंड हवेच्या ठिकाणी असणारी प्रेक्षणीय स्थळे बंदच रहाणार आहेत. या आठवड्यात कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन प्रेक्षणीय स्थळे खुली करण्यात येतील, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापुरकर यांनी दिली आहे.

प्रांताधिकारी संगीता राजापुरकर पुढे म्हणाल्या, ‘‘याविषयी हॉटेल आणि व्यावसायिक यांनी शासनाला सहकार्य करावे, तसेच येणार्‍या पर्यटकांनाही कोविड नियमांची आणि पर्यटनाविषयी माहिती द्यावी. नियमांविषयी टाळाटाळ करणार्‍या किंवा विरोध करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’