प्योंगयंग (उत्तर कोरिया) – अमेरिकेशी चर्चा आणि वेळप्रसंगी दोन हात करण्यासाठी सज्ज रहाण्याचा आदेश उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी सैन्याला दिला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने उत्तर कोरियाला अण्वस्त्र कार्यक्रम सोडून चर्चा करण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील सैन्यदलाची शस्त्रसज्जता वाढवण्याची घोषणा केली होती. ‘वर्कर्स पार्टी’च्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या दुसर्या बैठकीत किम जोंग सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी देशातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता वाढवण्याचा आदेश दिला.