पणजी, १५ जून (वार्ता.) – गोव्यात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हापसा येथील शहरी आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षाच्या प्रारंभी संपुष्टात येत आहे.
‘टिका उत्सव-३’ मध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील एकूण १४ सहस्र ८७३ लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे आणि याला चांगला प्रतिसाद लाभत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.