कोरोनाबाधित रुग्णांना साहाय्यासाठी ‘माझा बांदा’ संस्थेची जगभरातील बांदावासियांना हाक

सावंतवाडी – तालुक्यातील बांदा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. किरकोळ आजार वगळता मोठ्या आजारांवर उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयावर अवलंबून असणार्‍या गावांना सध्या कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराचा प्रश्‍न भेडसावत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचा आरोग्य विभागही हतबल झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या साहाय्यासाठी आता ‘माझा बांदा’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाबाधितांना अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी जगभरातील बांदावासियांना आर्थिक  किंवा वस्तूरूपी साहाय्य करण्याचे आवाहन या संस्थेने केले आहे.

या साहाय्यातून रुग्णांना रुग्णवाहिकेसह अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. इच्छुक दात्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बांदा शाखेतील खाते क्र. ०२३४००००००२०७९६ (आय.एफ्.एस्.सी. कोड – SIDC०००१०२३) वर आर्थिक साहाय्य जमा करावे. अधिक माहितीसाठी सरपंच अक्रम खान (भ्रमणभाष ९९२३३३७३८६) किंवा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील (भ्रमणभाष ९४२१२३८३११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.