काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

( प्रतिकात्मक छायाचित्र )

कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ? विस्थापित काश्मिरी हिंदूंनी पुनर्वसन होतांना काश्मीर मध्ये जायचे कुठे ? सर्व काश्मिरी हिंदूंच्या मूळ जागा पालटल्या गेल्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ? कलम ३७० नंतर स्थिती तीच आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला काश्मीरमध्ये रहाण्यासाठी सिद्धता करता येईल, असे सांगितले जाते; परंतु काश्मिरी हिंदूंचे पुन्हा ८ व्या वेळी पलायन होणार नाही, हे सरकार ठामपणे सांगू शकते का ? काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे.