मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या विरोधात पोलिसांनी कृती करावी, यासाठी तक्रार करायला हवी का ? पोलिसांना भोंग्यांवरून ऐकवण्यात येणारी अजान ऐकू येत नाही का ? 

मशिदींवरील भोंगे 

‘मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या देवनागर परिसरात किती मशिदींवर असलेल्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान दिली जाते ?, तसेच किती मशिदींनी भोंगे लावण्याची अनुमती घेतलेली नाही ?’, ही माहिती भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी विचारली होती. यावर ‘भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान दिल्याविषयी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही’, असे पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे. पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये गोवंडी परिसरात अनधिकृतरित्या भोंगे असलेल्या मशिदी आणि मदरसे यांची नावे माहितीसह दिली आहेत.’ (८.४.२०२५)