
‘हे कार्य लेखणीच करू शकेल. Pen is the mightest weapon than the nuclear warhead missiles. (‘लेखणी’ हे युद्धात वापरण्यात येणार्या आण्विक क्षेपणास्त्रांपेक्षा सर्वांत शक्तीशाली शस्त्र आहे.) लेखणीविना अन्य पर्याय नाही. आम्हाला आमचे वृत्तपत्र हवे. मासिके हवीत. हृदयापासून लिहिणारे निष्ठावंत आणि प्रतिभावान लेखक हवेत. प्रचारक हवेत. लेखणीविना आज पर्याय नाही.
सर जॉन वुड्राफप्रमाणे (टीप) लेखणीचे शस्त्र चालवून विरोधक पाश्चात्त्य आणि त्या छायेचे भारतीय यांची तोंडे बंद करायला हवीत, तसेच आणि त्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. हाच न्याय आहे. तेच राष्ट्रीय कर्तव्य आहे.
टीप : भारतीय संस्कृती, भाषा, परंपरा, भूगोल इत्यादींचा अभ्यास आणि लेखन करणारे ब्रिटीश विद्वान.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२३)