व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या, मनमिळाऊ, प्रेमभाव, सेवेची तळमळ आदी गुण असलेल्या पुणे येथील साधिका कै. (सौ.) सुवर्णा मुळे (वय ६१ वर्षे) !

२४ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण कै. (सौ.) सुवर्णा मुळे यांचे कुटुंबीय आणि पुणे येथील काही साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज आपण पुणे येथील अन्य साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.

कै. (सौ.) सुवर्णा मुळे

२. पुणे येथील साधक

२ ई. सौ. अनुराधा तागडे

२ ई १. व्यष्टी साधनेची तळमळ : ‘काकू नियमित व्यष्टी आढावा द्यायच्या. आध्यात्मिक त्रासामुळे काही वेळा नामजप किंवा स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचनांची सत्रे न्यून झाली, तर त्याची त्यांना खंत वाटायची. मनातील विचार त्या मनमोकळेपणाने सांगून ‘त्यावर मात कशी करायची ?’, हेही त्या वेळोवेळी विचारून घ्यायच्या. व्यष्टी आढाव्यात त्या सहसाधकांकडून सतत शिकण्याच्या स्थितीत असायच्या. आढावा देतांना ‘मी साक्षात् गुरुदेवांनाच व्यष्टी आढावा देत आहे’, असा त्यांचा भाव असायचा.

२ ई २. समष्टी सेवेची तळमळ : काकू साधनेत आल्यावर सत्संग घेणे, नवीन वर्गणीदार करणे, आधीच्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, वैयक्तिक संपर्क करणे, शाळा आणि निवासी वसाहतींमध्ये उपक्रम घेण्यात सहभागी असायच्या. त्यांनी आपुलकीने आणि प्रेमाने वाचक अन् जाहिरातदार यांना जोडून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे वाचक लगेच पुन्हा अंक नूतनीकरण करून द्यायचे. त्या प्रसारातील कोणतीही सेवा सांगितली, तरी लगेच ती सेवा करायला सिद्ध असायच्या.’

२ उ. सौ. ज्योती कदम

२ उ १. नीटनेटकेपणा : ‘त्यांचे घर लहान असूनही स्वच्छ आणि नीटनेटके होते. त्यांच्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटायचे.

२ उ २. वक्तशीरपणा : काकूंसह मी २ वर्षे सेवा केली. त्या सेवेचे नियोजन चांगल्या प्रकारे करायच्या. वेळेत सेवा करून वेळेत संपवायच्या.

२ उ ३. प्रांजळपणा : त्या स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगायच्या. त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून ‘त्यांना चुकांचे गांभीर्य किती आहे ?’, हे लक्षात यायचे.’

२ ऊ. सौ. अनघा कुलकर्णी

२ ऊ १. प्रेमभाव : ‘वर्ष २००३ पासून काकूंसह माझ्या सेवेला आरंभ झाला. काकूंचे घर आणि आमचे घर जवळच होते. त्यामुळे प्रतिदिन आम्ही सेवेला एकत्र जायचो. आम्ही प्रसाराला अथवा संपर्काला गेल्यानंतर त्या जिज्ञासूंशी प्रेमाने बोलायच्या. त्यांची विचारपूस करायच्या. नंतरच साधनेविषयी सांगायच्या. त्यामुळे जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळायचा.

२ ऊ २. गुरुदेवांवर श्रद्धा : एका साधिकेच्या समवेत दुचाकीवरून जातांना अपघात झाला होता. गुरुकृपेने त्यांच्या केवळ पायाला दुखापत झाली. काही दिवस विश्रांती घेतल्यावर त्यांनी लगेचच सेवेला आरंभ केला. ‘या स्थितीतही गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे मी सेवा करू शकत आहे’, असे त्या नेहमी म्हणायच्या.’

२ ए. श्रीमती सुरेखा सुतार

२ ए १. इतरांचा विचार करणे : ‘कुठेही प्रसारसेवेला जायचे असेल, तर काकू कात्रजमधील साधकांना समवेत घेऊन सेवेला जायच्या. समजा एखाद्या साधकाला उशीर होत असेल, तर काकू त्या साधकाची ‘१० मिनिटे वाट पाहून मग आपण प्रसाराला जाऊया’, असे सांगायच्या. त्या वेळी ‘त्या साधकालाही सेवेची संधी मिळावी’, असा त्यांचा उद्देश असायचा.

२ ए २. आध्यात्मिक मैत्रीण : कधी काही प्रसंग घडले, तर मी काकूंचे साहाय्य घ्यायचे. त्या वेळी त्या मला प्रसंगात  कसे असायला हवे ? माझे कुठे चुकते ?’, हे समजावून सांगायच्या. त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक दृष्टीकोनांमुळे माझ्या मनावरचा सर्व ताण निघून जायचा आणि मनही शांत रहायचे.

२ ए ३. प्रेमभाव : पूर्वी मी कार्यालय सुटल्यानंतर त्यांच्याकडून दैनिक किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ घेऊन यायचे. प्रत्येक वेळी काकू चहा घेतल्याविना मला सोडायच्या नाही. त्या साधकांमध्ये गुरुरूप पहायच्या.

२ ए ४. कुटुंबभावना : त्या सर्वांशी मिळून मिसळून आणि सलोख्याने रहायच्या. त्यांच्या चाळीमध्ये त्यांनी कुटुंबभावना निर्माण केली होती.’

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक