केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

रामदास आठवले

सिंधुदुर्ग – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले २१ मे या दिवशी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी दिली.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा जिल्हा दौरा

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार २१ मे या दिवशी सायंकाळी जिल्ह्यात येणार असून २२ मे या दिवशी ते तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली.