हिंदूंमध्ये शौर्य जागरण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन ! 

पट्टणकोडोली (जिल्हा कोल्हापूर) – लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. चंदन गुप्ता याची हत्या करण्यात आली, तर गुप्तचर खात्यातील अंकित शर्मा याचीही देहलीच्या दंगलीत हत्या करण्यात आली. दंगली, हत्या, बलात्कार याचसमवेत आज पोलिसांवरही धर्माधांचे आक्रमण होत आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये शौर्य जागरण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण दिले जाते. यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याविषयी मार्गदर्शन केले जाते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. ते ऑनलाईन स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात बोलत होते.

पट्टणकोडोली येथील छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानने व्याख्यानाचा प्रसार, तसेच नियोजन हे सर्व पुढाकार घेऊन केले. या व्याख्यानासाठी शंभूराजे प्रतिष्ठानमधील ३१ कार्यकर्ते ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. संकेत कुलकर्णी यांनी केले. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या संदर्भातील प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला.

उपस्थितांचे मनोगत

१. श्री. शिवानंद पणदे, छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान – स्वरक्षण प्रशिक्षण ही आज काळाची आवश्यकता आहे.
२. श्री. अनिकेत पिसाळ – हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. ते झाल्यास अन्य गोष्टीही साध्य होतील.
३. श्री. रोहित – या प्रात्यक्षिकातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. या माध्यमातून इतरांनाही जोडूया.