एक वर्षापासून भारतात करत आहेत भ्रमंती !
हरिद्वार (उत्तराखंड) – सध्या स्वित्झर्लंड येथून कुंभमेळ्यासाठी आलेल्या ३३ वर्षीय बेन बाबा या विदेशी नागरिकाच्या मुलाखतीचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारत होत आहे. बेन ४ वर्षे स्वित्झर्लंड येथून १८ देशांना चालत पार करत भारतात पोचला आणि गेले वर्षभर तो भारतात आहे. या काळात त्याने हिंदी भाषा बोलण्यास शिकली आहे. भारतातील योग, ध्यान आणि अध्यात्म यांनी प्रेरित होऊन येथे आला. व्यवसायाने तो वेब डेव्हलपर आहे. सध्या तो हिमाचल प्रदेशमध्ये तो रहात आहे.
१. या व्हिडिओमध्ये बेन याने सांगितले की, त्याला त्याच्या कामातून चांगले उत्पन्न मिळत होते; मात्र सुख कधीच मिळाले नाही. त्याला आध्यात्मिक सुख हवे होते. त्याच्या शोधासाठी तो भारतात आला आणि त्याला भारतीय संस्कृती, योग्य, ध्यान आणि अध्यात्म यांतून आत्मिक सुख लाभत आहे.
२. बेन याने स्वित्झर्लंडमध्ये असतांनाच भारतीय संस्कृती, अध्यात्म, ध्यान यांच्याविषयी जाणून घेण्यास प्रारंभ केला होता. आता भारत भ्रमण करतांना तो मंदिर, मठ आणि धर्मस्थळे यांना भेट देऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहे. पतंजलि संस्थेमध्ये तो योगही शिकत आहे.
३. बेन बाबा भिक्षा मागून पोट भरत आहेत. विना पादत्राणेच तो प्रवास करतो. निर्जन स्थानी, जंगल, पदपथ आदी ठिकाणीच झोपतो, असे त्याने सांगितले.