सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी !

सातारा भरारी पथकाची कारवाई

सातारा – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा येेेथील भरारी पथकाने वाई तालुक्यातील पांडे आणि कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे धाडी टाकून अवैधरित्या मद्यविक्रीच्या बाटल्या आणि २ चारचाकी वाहने, असा २ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

पांंडेे गावातील तुषार सुरेश पवार यांंच्याकडूून केवळ गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी मद्याच्या १७८ सीलबंद बाटल्या आणि देशी मद्याच्या ४८ सिलबंद बाटल्या अन् १ चारचाकी वाहन कह्यात घेतले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथून अतुल पोपट धुमाळ यांच्याकडून केवळ गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी मद्याच्या १२ सीलबंद बाटल्या आणि १ चारचाकी वाहन पोलिसांनी कह्यात घेतले आहे.