परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सौ. कविता रविकांत शहाणे 

१ अ. ‘भावसोहळ्याच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे’, असे वाटणे आणि प्रत्यक्ष गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवणे अन् प.पू. गुरुदेवांची पाद्यपूजा चालू असतांना सुगंध येणे : ‘भावसोहळ्याच्या दिवशी मला सर्व सिद्धता करतांना वातावरण पुष्कळ उत्साहवर्धक वाटत होते. ‘आज गुरुपौर्णिमाच आहे’, असे मला वाटत होते. सगळीकडे चैतन्य जाणवून दोन्ही दिवस माझा भाव सतत जागृत होत होता. भावसोहळ्याला प्रारंभी ३ – ४ मिनिटे मला काहीच दिसत नव्हते; पण प्रार्थना केल्यावर लगेच मला कार्यक्रम दिसू लागला. भावसोहळ्याच्या वेळी प्रत्यक्ष गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवत होते. श्री. वझेकाकांनी ‘ॐ’चा उच्चार केला. त्या वेळी ते घरातच ‘ॐ’ म्हणत असल्याप्रमाणे स्पंदने येत होती. प.पू. गुरुदेवांची पाद्यपूजा चालू असतांना सुगंध येत होता.

१ आ. श्री भवानीमातेची मिरवणूक बघतांना भावजागृती होऊन मन निर्विचार होणे आणि ‘अन्य साधकांप्रमाणे स्वतः भवानीमातेला उचलून घेतले आहे’, असे वाटणे : श्री भवानीमातेची मिरवणूक बघतांना माझा भाव जागृत होऊन मन निर्विचार अवस्थेत होते. देवीला उचलून घेतलेले दृश्य पहातांना मी डोळे मिटले नव्हते. त्या वेळी माझे ध्यान लागले होेेेेेेेेेेेेेेेेते कि नाही, ते कळत नव्हते; पण ५ मिनिटांनी अन्य साधकांप्रमाणे ‘मीसुद्धा भवानीमातेला उचलून घेतले आहे’, असे मला वाटले. कार्यक्रम पहातांनाच तसे जाणवून पुष्कळ आनंद वाटला आणि कृतज्ञताही व्यक्त झाली.

१ इ. साधना करतांना न्यून पडत असल्याची खंत वाटणे : दोन्ही दिवसांचा भावसोहळा पहातांना गुरुमाऊलींना अनुभवत असतांना ‘आजपर्यंत आमच्याकडून पुष्कळ चुका झाल्या. गुरुमाऊलींनी सांगितलेली साधना करतांना न्यून पडत असलो, तरीही कृपाळू गुरुमाऊली सतत आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे’, असे वाटून पुष्कळ खंत वाटत होती.

‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुमच्याच कृपेने आम्ही या घनघोर आपत्काळात आनंदी आणि समाधानी राहू शकतो. आम्हा सर्व साधकांवर आपली अशीच कृपादृष्टी असू दे’, ही आपल्या कोमल चरणी प्रार्थना करत आहे. परम पूज्य गुरुमाऊलींच्या कृपेमुळे हे सर्व अनुभवता आले; म्हणून त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’

२. श्री. प्रसाद म्हैसकर  

२ अ. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांचे मार्गदर्शन ऐकतांना श्री गुरुदेवांचे निर्गुण रूप कार्यरत असल्याचे जाणवून मन निर्विचार होणे आणि ‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा ।’ या श्री गुरुदेवांच्या वचनाची अनुभूती येणे : ‘या कार्यक्रमाचा लाभ सगळ्यांना व्हावा; म्हणून धडपडणार्‍या, तसेच घरी कार्यक्रमासाठी जोडणीची चांगली व्यवस्था केलेली मुले आणि साधक यांच्याविषयी मला कृतज्ञता वाटली. श्री गुरूंची सारखी आठवण येत असल्याने कृतज्ञताभाव वाढून माझा भाव जागृत होत होता. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांचे मार्गदर्शन ऐकतांना श्री गुरुदेवांचे निर्गुण रूप कार्यरत असल्याचे जाणवून मन निर्विचार होत होते. ‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा ।’ या श्री गुरुदेवांच्या वचनाची अनुभूती येत होती. ‘प.पू. डॉक्टर आजारी का पडतात ?’, अशा प.पू. गुरुदेेेेवांविषयी मनात आलेल्या विचारांचे उत्तर सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या मार्गदर्शनातून स्पष्ट झाले. ‘परिस्थिती देवाने घडवली’, हे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांचे सूत्र आताच्या घडीला अतिशय उपयुक्त वाटून ‘हिंदु राष्ट्र (कलियुगांतर्गत सत्ययुग) स्थापनेच्या कार्यात सद्यःस्थिती ईश्‍वरेच्छेनेच निर्माण झाली आहे’, हे लक्षात आल्यावर लगेच कृतज्ञता वाटली.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक