साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती

आयकर विभागाने सर्वांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. लिंक करण्याचा शेवटचा दिनांक ३१ मार्च २०२१ निश्‍चित केला असून हे दोन्ही कार्ड्स लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड निकामी (out of service) होणार आहे, असे आयकर विभागाने घोषित केले आहे. तसेच आयकर कायद्यानुसार (Income Tax Act) आपल्याला १० सहस्र रुपयांपर्यंतचा दंडही (fine) भरावा लागू शकतो.

आपण आपले आधार आणि पॅन लिंक आहे कि नाही, याची माहिती संगणक किंवा मोबाईल यांवर इंटरनेट (internet) द्वारे मिळवू शकतो. यासाठी पुढील प्रक्रिया करावी.

१. सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

२. हे पान (पेज) उघडल्यावर डाव्या बाजूला Quick Links (क्विक लिंक) या स्तंभात Link Aadhaar या पर्यायाच्या लिंकवर Click करावे.

३. नव्या उघडलेल्या पानात आपले १० अंकी पॅनकार्ड आणि १२ अंकी आधारकार्डचे तपशील द्यावे लागतील. (जर आपल्या आधारकार्ड वर केवळ वर्ष असेल, तर I have only year of birth in Aadhaar Card या स्तंभाला tick करावे, अन्यथा करू नये.)

४. त्यानंतर I agree to validate my Aadhaar details with UIDAI येथे tick करावे आणि खाली दिलेला captcha code भरून Link Aadhaar या पर्यायावर Click करावे.

५. आपले आधार आणि पॅन लिंक असेल, तर ‘Your PAN is already linked to the given Aadhaar Number.’, अशी सूचना येईल. जर आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तशी सूचना येणार नाही; पण PAN आणि Aadhaar लिंक करण्याची प्रक्रिया चालू होईल. आधार आणि पॅन लिंक झाले आहे की नाही, याची थोड्या वेळाने अथवा दुसर्‍या दिवशी वरील पद्धत वापरून निश्‍चिती करता येईल.

साधक तसेच वाचक यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. साधकांकडून ही प्रक्रिया निर्धारित समयमर्यादेत पूर्ण होत आहे ना, याकडे जिल्हासेवकांनी लक्ष ठेवावे.