स्वामी विवेकानंद यांचे काही विचार

स्वामी विवेकानंद

१. जी गोष्ट दुसर्‍याने करू नये, असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपण दुसर्‍याच्या संदर्भात करू नये.

२. प्रेमाची (निरपेक्ष प्रीतीची) लक्षणे :

अ. प्रेमात सौदेबाजी नसते. असले तर केवळ देणे. घेणे कधीच नाही.

आ. प्रेम भीती जाणत नाही.

इ. प्रेम केलेल्या व्यक्तीचा गुणदोषांसह सहज स्वीकार करणे.

३. जो सर्वांवर प्रेम करू शकेल, तोच भगवंताला प्रिय होईल.

४. भीती हाच मृत्यू होय. निर्भय व्यक्तीच सहजतेने आपल्या जीवनाचे सार्थक करू शकेल. भीतीने मरत जगण्यापेक्षा निर्भयतेने जगून एकदाच देहाने मरू.

५. मी ज्या देशात (अमेरिकेत) आलो आहे, तेथे शिंपी माणसाला सभ्य बनवतो आणि मी ज्या देशातून (भारतातून) आलो आहे, तेथे चारित्र्य माणसाला सभ्य बनवते.

(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)