पुणे – आयडीबीआय आणि दोन खासगी अधिकोषांच्या खासगीकरणाच्या संदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात अधिकोष कर्मचार्यांनी २ दिवसांचा संप पुकारला आहे. सार्वजनिक, खासगी, विदेशी क्षेत्रासह ५६ प्रादेशिक ग्रामीण अधिकोषांमधील १० लाखांहून अधिक अधिकोष कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी आहेत. हे अधिकोष एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के (१५० लाख कोटी रुपयांचा) व्यवसाय हाताळतात. १५ आणि १६ मार्च या दिवशी असणार्या संपात ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनसह ९ संघटना सहभागी होत आहेत.