आम्ही जसे ठेवू, तसे चीनशी संबंध असतील ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

नवी देहली – चीनसमवेत आम्ही जसे ठेवू, तसे त्याच्याशी संबंध असतील, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे पुढे म्हणाले की, चीनच्या सीमेवर शांतता आणि स्थिरता कशी राहील, हे एक शेजारी या नात्याने आम्ही पहात असतो. सीमेवर अशांतता आणि अस्थिरता रहावी, असे कुणालाही वाटणार नाही. मला वाटते की, चीनशी कशा प्रकारचे नाते विकसित केले जावे, हा पूर्णपणे सरकारचा विचार आहे. यात जसे आपल्याला अपेक्षित आहे, तसेच हे नाते विकसित केले पाहिजे. एक सरकार आणि एक राष्ट्र या दृष्टीने आम्ही राष्ट्रहित सर्वतोपरी असल्याचे दाखवून दिले आहे.