मनात येणारा मायेतील प्रत्येक विचारही देवापर्यंत पोचतो आणि देव ती इच्छा त्वरित पूर्ण करतो, या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. सेवेला उपयोगी होईल, अशी भेट मिळावी, असा विचार आल्यावर प्रवासी बॅग मिळणे !

एकदा मी नात्यातल्या एका लग्न समारंभाला गेलो असता सेवेला उपयोगी होईल, अशी भेट (रिटर्न गिफ्ट) आपल्याला मिळायला हवी, असा विचार माझ्या मनात आला. त्यांनी मला प्रवासी बॅग दिली. सेवेसाठी कुठेही जातांना मला तिचा उपयोग करता आला.

श्री. प्रताप जोशी

२. मनात पेप्सी खाण्याचा विचार येताच पाहुणीने पेप्सी आणणे

एकदा मी बाहेर गेलो असता माझ्या मनात पेप्सी खावी, असा विचार आला; परंतु घरी परत जातांना मी ती न घेताच गेलो. मी दार उघडून घरात पाऊल टाकेपर्यंत सौ. ममता ताम्हनकर आमच्याकडे आल्या. त्या पेप्सी घेऊनच आल्या होत्या.

३. उभयतांची प्रकृती ठीक नसतांना खाण्याची व्यवस्था कशी करायची ? असा प्रश्‍न पडल्यावर मेहुणीने घरी येतांना आपणहून उत्तपे करून आणल्याने चिंता दूर होणे

माझी प्रकृती अनेक वेळा बिघडते. त्यामुळे पत्नीला माझ्याकडे पुष्कळ लक्ष द्यावे लागते. एकदा माझी आणि पत्नीची प्रकृती बरी नसतांना ताण सहन न होऊन ती मला म्हणाली, आज तुमच्या खाण्याची व्यवस्था तुम्हीच करा. मी तुमच्यासाठी काही करणार नाही. त्या वेळी माझी स्थिती काही शिजवून खाण्याची अथवा बाहेर जाऊन खाण्याचीही नव्हती. त्यामुळे माझ्या समोर मोठे संकट उभे राहिले. तिने हे सांगितल्यावर ५ मिनिटांतच माझी मेहुणी मला पहाण्यासाठी आमच्याकडे आली. येतांना तिने आमच्यासाठी उत्तपे आणले होते. देवाने आम्हा दोघांचाही ताण पूर्णपणे घालवला.

सातत्याने अनुभूती देऊन मला सत्मध्ये ठेवल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.

– श्री. प्रताप जोशी, रत्नागिरी (१४.११.२०१८)