‘रुग्णालये ही ख्रिस्ती लोकांसाठी धर्मांतर करण्याची केंद्रे बनली आहेत. बहुतांश रुग्णालयांत परिचारिका, आरोग्यसेवक, समुपदेशक आणि इतर कर्मचारीवर्ग हे ख्रिस्ती असतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरीब हिंदु रुग्णांना स्वतःच्या जाळ्यात ओढणे त्यांना सहज शक्य होते.
१. समुपदेशक म्हणून नेमणूक झालेल्या एका ख्रिस्ती महिलेने हिंदु रुग्णांची दिशाभूल करून ‘येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती पंथ किती चांगला आहे ?’, हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे
मी ज्या रुग्णालयात नोकरी करतो, तेथे पुष्कळ ख्रिस्ती कर्मचारी आहेत. मी काम करत असलेल्या वंध्यत्व निवारण विभागात एका ख्रिस्ती महिलेची समुपदेशक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ‘येथे उपचारांसाठी येणार्या रुग्णांना या प्रक्रियेविषयी माहिती देऊन ती समजावून सांगणे, तसेच तिचेे उपचारमूल्य अन् संबधित सूत्रे सांगणे’, असे तिचे काम आहे.
ही महिला समुपदेशन करतांना हिंदु रुग्णांना ‘तुम्ही उपवास करता का ? तुमचा कोणत्या देवावर विश्वास आहे ?’, अशा प्रकारचे प्रश्न विचारते. त्यांची उत्तरे ऐकून ती त्यांना म्हणते, ‘‘तुम्ही इतकी वर्षे देवाची प्रार्थना आणि उपवास करत आहात; तर अजून तुम्हाला बाळ कसे झाले नाही ? याचा अर्थ तुमचा देव अस्तित्वात नाही. मी येशू ख्रिस्ताला पाहिले आहे आणि त्याच्या कृपेची अनुभूती घेतली आहे. माझ्याकडे जे काही आहे, ती सर्व त्याचीच कृपा आहे. तो आपल्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतो.’’ असे बोलून ती रुग्णांना ‘येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती पंथ किती चांगला आहे ?’, हे पटवून देण्याचा प्रयत्न करते.
१ अ. ख्रिस्ती महिलेने एका युवा महिला आधुनिक वैद्याच्या परिस्थितीचा अपलाभ करून घेणे, तिला येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती संप्रदाय यांविषयी सांगून तिचे मनपरिवर्तन करणे अन् तिला चर्चमध्ये प्रत्येक रविवारी होणार्या प्रार्थनेला उपस्थित रहाण्याचे महत्त्व सांगणे : एकदा ‘प्रसुती’ या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणार्या एका युवा महिला आधुनिक वैद्याची माझ्या विभागात १ मासासाठी नेमणूक करण्यात आली होती. ही युवती मूळची एका सधन पंजाबी कुटुंबातील होती. तिच्या आईचे नुकतेच निधन झाले असल्याने ती काहीशी निराश होती. आमच्या विभागातील समुपदेशन करणार्या ख्रिस्ती महिलेने या परिस्थितीचा अपलाभ करून घेतला आणि तिला येशू ख्रिस्त अन् ख्रिस्ती संप्रदाय यांविषयी सांगून तिचे मनपरिवर्तन केले, तसेच तिला चर्चमध्ये प्रत्येक रविवारी होणार्या प्रार्थनेला उपस्थित रहाण्याचे महत्त्व सांगितले.
१ आ. ख्रिस्ती महिलेच्या बोलण्याला फसून त्या युवतीने रविवारच्या प्रार्थनेला जाण्यास आरंभ करणे आणि तिच्या मैत्रिणींनी ती महिला रुग्णांचे धर्मांतर करत असल्याविषयी सांगितल्यावर युवतीने त्या महिलेला टाळणे : नकळतपणे ही पंजाबी युवती तिच्या बोलण्याला फसली आणि तिने रविवारच्या प्रार्थनेला जाण्यास आरंभ केला. याविषयी तिच्या मैत्रिणींना समजल्यावर त्यांनी समुपदेशन करणारी ख्रिस्ती महिला रुग्णांचे धर्मांतर करत असल्याविषयी तिला समजावून सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर पंजाबी मुलगी त्या ख्रिस्ती महिलेला टाळू लागली, तसेच तिने तिचा भ्रमणभाष क्रमांक ‘ब्लॉक’ केला.
२. अशा लोकांनी गंभीर नसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून रुग्णांसाठी प्रार्थना करणे आणि औषधोपचाराने हे रुग्ण बरे झाल्यावर ‘त्यांनी केलेली प्रार्थना अन् जिझस् यांमुळे रुग्ण बरा झाला आहे’, हे पटवून देण्याचा प्रयत्न करून प्रार्थनेसाठी रविवारी चर्चमध्ये यायला सांगणे
धर्मांतर करणारे लोक अतीदक्षता विभागात भरती केलेल्या रुग्णांची माहिती मिळवतात. या विभागातील काही रुग्ण फारसे गंभीर स्थितीत नसतात आणि काहींना केवळ निरीक्षणासाठी भरती केलेले असते. धर्मांतर करणारे हे लोक अशा रुग्णांच्या नातेवाइकांशी संपर्क साधतात आणि ‘रुग्ण लवकर बरा व्हावा; म्हणून प्रार्थना करतो’, असे सांगून २ – ४ वेळा प्रार्थनाही करतात.
साहजिकच विभागात चालू असलेल्या औषधोपचाराने हे रुग्ण बरे होतात; पण हे लोक रुग्णाला ‘तो त्यांनी केलेली प्रार्थना आणि जिझस् यांमुळे बरा झाला आहे’, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात, तसेच ‘तुम्हाला जिझस्कडे असलेल्या दैवी शक्तीमुळे जीवनदान मिळाले असून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी प्रत्येक रविवारी चर्चमध्ये या’, असे सांगतात. जे रुग्ण अत्यंत गंभीर आजारी असतात, त्यांच्यामध्ये या ख्रिस्ती लोकांना रस नसतो; कारण ‘असे रुग्ण बरे होण्याची शक्यता अत्यल्प असते’, याची त्यांना कल्पना असते.
अशा काही लोकांसाठी रुग्णालय हे धर्मांतर करण्याचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. त्यामुळे ‘असेे प्रकार घडू नयेत’, यासाठी संस्था, रुग्णालये आणि चिकित्सागृह यांनी आवश्यक ती काळजी घेऊन योग्य ती पावले उचलायला हवीत.’
– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, कर्नाटक. (फेब्रुवारी २०२०)
आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस कळवा. आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा – ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |