(म्हणे) ‘शीत युद्ध झाल्यास संपूर्ण जगाची हानी होईल !’ – शी जिनपिंग यांची चेतावणी

युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्‍या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी आणि मग जगाला उपदेश करावा !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

दावोस (स्वित्झर्लंड) – छोटे गट बनवणे अथवा शीत युद्ध प्रारंभ करणे, इतर देशांना धमकी देणे, यांमुळे जगाचे विभाजन होईल. जगात असलेल्या तणावामुळे प्रत्येक देशाची हानी होणार असून नागरिकांच्या हिताचा बळी जाणार आहे, असे विधान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले. ते ‘जागतिक आर्थिक मंचा’च्या (‘डब्ल्यू.ई.एफ्.’च्या) ‘दावोस अजेंडा परिषदे’तील विशेष भाषणात बोलत होते. परस्पर लाभ आणि सहकार्य यांसाठी वैचारिक पूर्वग्रह सोडून दिले पाहिजेत. संवादाच्या माध्यमातून सर्व वाद सोडवता येऊ शकतात यावर चीनचा विश्‍वास आहे’, असेही ते म्हणाले.

कोरोनाचा शेवट अद्याप दूर ! – चीन

कोरोनाविरोधातील लढाईत आता प्राथमिक यश मिळाले असले; तरी या महासाथीच्या आजाराचा शेवट अद्याप दूर आहे, असा दावा या वेळी शी जिनपिंग यांनी केला.