‘श्री. निरंजन चोडणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गातील सर्व युवा साधकांकडून दादाला कवितारूपी शुभेच्छा !
शक्ती, भक्ती अन् युक्ती यांचा पवित्र संगम ।
आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा विहंगम ॥ धृ ॥
सदा अंतरी असे श्री गुरूंचा ध्यास ।
तळमळला हा जीव गुरूंचा होण्यास ॥ १ ॥
आज्ञाधारक शिष्य असे तू ।
‘गुरूंचे मन जिंकणे’, हा एकच हेतू ।
भावभक्तीच्या सुगंधी फुलांनी ।
रामनामाचा सजव तू सेतू ॥ २ ॥
निरंजनाच्या ज्ञानप्रकाशाने गाव-शहरांतील ।
युवक जागले, धर्मकार्यास्तव ते तत्पर झाले ।
या सेवेचे कर्तेपण दादाने गुरुचरणी वाहिले ॥ ३॥
अंगात वीरवृत्ती, मनात भोळा भाव ।
‘गुरु हेच जीवनाचे अंतिम सत्य’ ।
एवढेच तुला ठावे ॥ ४ ॥
निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।
हीच श्री गुरुचरणी भावपूर्ण प्रार्थना ॥ ५ ॥
निरंजनदादाला सर्व युवा साधकांचा नमस्कार !’
– सिंधुदुर्गातील युवा साधक, सिंधुदुर्ग (२७.१२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |