बिहारमध्ये अधिवक्त्याची गोळ्या झाडून हत्या

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !

अधिवक्ता झा (उजवीकडे) घटनास्थळी आलेले पोलिस

वैशाली (बिहार) – काही दिवसांपूर्वीच राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे ‘इंडिगो एअरलाइन्स’चे विमानतळ व्यवस्थापक रूपेश सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता वैशाली येथे दिवाणी न्यायालयातील अधिवक्ता शिव रंजन झा उपाख्य पप्पू झा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. अधिवक्ता झा हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.