सैदापूर येथील सैनिकाची नातेवाइकांकडून हत्या


सातारा, २ जानेवारी (वार्ता.) – भारतीय सैन्य दलातील सैनिक संदीप पवार हे सैदापूर (जिल्हा सातारा) येथील त्यांच्या गावी सुट्टीवर आले होते. नातेवाइकांडून त्यांना मारहाण झाली. नंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते; मात्र उपचार चालू असातांना मृत्यू झाला. याविषयीची तक्रार सातारा पोलिसात प्रविष्ट झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात सैनिक संदीप पवार यांच्या त्रासाला कंटाळून पत्नी चेतना, भावजय सुषमा पवार आणि मेव्हणा सोमनाथ आंबवले यांनी सैनिक संदीप पवार यांना मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघा नातेवाइकांना अटक केली असून त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.