पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक आस्थापने बंद होण्याच्या मार्गावर

पुणे – केंद्र सरकारचा निश्‍चलीकरणाचा निर्णय (नोटाबंदी), वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) कायद्याच्या कार्यवाहीतील गोंधळ, तसेच आर्थिक मंदी या सर्वांचा फटका उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळेच पुणे, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातील ५०० हून अधिक उद्योजकांनी आस्थापने बंद करण्यासाठी कंपनी नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत, असे ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड’चे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी सांगितले.

‘आस्थापनाची मालमत्ता अल्प आणि देणी अधिक असतील, तर आर्थिक प्रक्रियेनुसार आस्थापनाला समापनाच्या प्रक्रियेमधून जावे लागते. या प्रकरणांमध्ये आस्थापनांचे व्यवहारच झाले नसल्याने ही खरोखर तांत्रिक प्रक्रिया आहे कि बँकांची फसवणूक करण्यासाठी स्वत:च आस्थापने बंद करण्याची प्रक्रिया चालू केली गेली आहे, हे पहावे लागेल’, असे कामगार नेते प्रा. अजित अभ्यंकर यांनी सांगितले.