भारताविरोधातील आक्रमकता थांबवण्याचा अमेरिकेचा चीनला सल्ला

अमेरिकेचे संरक्षण विधेयक संमत

अमेरिकन संसद (व्हाईट हाऊस)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

राजा कृष्णमूर्ती

भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी संसदेमध्ये संरक्षण धोरण विधेयकात तरतुदीचा मसुदा मांडला होता. अमेरिकेच्या संरक्षण विधेयकात या सूत्राचा समावेश होणे म्हणजे भारताला अमेरिकेचे भक्कम समर्थन असल्याचे सिद्ध होत असल्याचे म्हटले जात असून हा चीनसाठी स्पष्ट संदेश असल्याचे तज्ञांचे मत आहे.