भाव म्हणजे केवळ भावच असतो ।
त्यात कुठेही बुद्धीचा अडथळा नसतो ॥ १ ॥
‘हे का आणि ते कसे ?’, असे भावात नसते ।
भावात केवळ देवाची प्रीती अनुभवायची असते ॥ २ ॥
देवाच्या आठवणीने मन आनंदी होते ।
फुलपाखरासम ते हलके होऊन जाते ॥ ३ ॥
भाव म्हणजे केवळ भावच असतो ।
त्यात कुठेही अहंचा लवलेश नसतो ॥ ४ ॥
स्वभावदोष जरी असती डोंगरापरी ।
भावसुमनाने त्याची माती होऊन जाई ॥ ५ ॥
भाव म्हणजे केवळ भावच असतो ।
देवाच्या प्रीतीचा महासागरच असतो ॥ ६ ॥
भावाचे ‘अ, आ, इ’ ज्यांनी आम्हाला शिकवले ।
त्या आमच्या परात्पर गुरु डॉक्टरांना त्रिवार वंदन करते ॥ ७ ॥
– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (३.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |