चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी तो इटलीमध्ये झाला होता ! – इटलीच्या डॉक्टरचा दावा

डॉक्टर गिऊसेपी रेमुजी,इटली

वॉशिंग्टन (अमेरिका) – इटलीच्या डॉक्टरांना नोव्हेंबर २०१९ मध्ये न्युमोनियाचे काही रुग्ण आढळले होते. या रुग्णांमध्ये सामान्यतः असणार्‍या न्युमोनियाच्या लक्षणांपेक्षा वेगळ्या प्रकारची लक्षणे आढळली होती. त्यावरून इटलीचे डॉक्टर गिऊसेपी रेमुजी यांनी ‘चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी तो इटलीमध्ये झाला होता’, असा दावा केला आहे.