कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कळंबा कारागृहामधील ४५० बंदीवानांना तात्पुरता जामीन मिळण्याची शक्यता

कोल्हापूर – कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह देशातील मध्यवर्ती आणि जिल्हा कार्यालयात शिक्षा भोगणार्‍या बंदीवानांची गर्दी न्यून करण्यासाठी बंदीवानांना तात्पुरत्या जामीन (पॅरोल)वर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे कळंबा कारागृहातील ४५० बंदीवानांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

याविषयी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपिठाने प्रत्येक राज्य सरकार यांना उच्च समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी गंभीर गुन्हेगार, घडलेल्या गुन्ह्याचे स्वरूप, बंदीवानाचे कारागृहातील वर्तन इत्यादी गोष्टींचा ही समिती तात्पुरत्या जामिनासाठी विचार करणार आहे. ‘याविषयी अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्राप्त झाला नसून निकाल उपलब्ध होताच तात्काळ त्याची कार्यवाही केली जाईल आणि तसा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला जाईल’, असे कळंबा कारागृहांचे अधीक्षक शरद बोबडे यांनी सांगितले.