उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी श्री सिद्धिविनायकाचे घेतले भावपूर्ण दर्शन !

मुंबई – ‘सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी’, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी मुंबईच्या प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक पटांगणात ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले. हा यज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु अन् संत यांनी १६ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री सिद्धिविनायकाचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.

याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.
या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव, सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु स्वाती खाडये, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सद्गुरु सत्यवान कदम, पू. अशोक पात्रीकर, तसेच कु. वैदेही खाडये, सौ. सायली करंदीकर आणि श्री. श्रीहरि नीलेश सिंगबाळ हे उपस्थित होते.
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !