
१. साधकाला पडलेल्या स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला अन्य एका साधकाविषयी विचारणे

‘१६.६.२०२६ या दिवशी पहाटे ४ वाजता मला स्वप्नात दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि मी एका खोलीत आहोत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला म्हणाले, ‘पूर्वी तुझ्या समवेत असलेला साधक आता कसा आहे ?’ मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्या साधकाचे नाव सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘हो. तोच साधक. सध्या साधकांची नावे माझ्या लक्षात रहात नाही. तू माझ्या डायरीत त्या साधकाच्या नावाची नोंद करून ठेव, म्हणजे माझ्या लक्षात राहील.’ त्यानंतर मी तेथील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डायरीत त्या साधकाची नोंद केली. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘ठीक आहे.’
२. साधकाने संबंधित साधकाला स्वप्नाविषयी सांगितल्यावर त्या साधकाने ‘३ दिवस मनःस्थिती ठीक नव्हती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले’, असे सांगणे
त्याच दिवशी दुपारी मी संबंधित साधकाला स्वप्नाविषयी सांगून म्हणालो, ‘स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी तुझी आठवण काढली.’ माझे बोलणे ऐकून तो साधक म्हणाला, ‘‘गेले ३ दिवस माझ्या मनाची स्थिती ठीक नव्हती. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आत्मनिवेदन करतांना ‘तुमचे माझ्याकडे लक्ष नाही. तुम्ही मला विसरला आहात’, असे सांगत होतो. तुम्ही स्वप्नाविषयी सांगितल्यावर माझ्या मनातील विकल्प दूर झाले आहेत.’’
३. या प्रसंगानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी माझ्या स्वप्नात येऊन त्या साधकाची श्रद्धा कशी जपली !’, हे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२६)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !