जानेवारी २०२६ मध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सपत्नीक दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथे आले होते. १३.१.२०२६ या दिवशी त्यांच्या सत्संगात साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. कु. अदिती पोतदार (वय १३ वर्षे)

अ. ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या चरणांची बोटे गुलाबी आणि तळपाय श्रीकृष्णाच्या चरणांसारखे निळे वाटत होते. त्यांच्या चरणांकडे पाहून मला पुष्कळ शांत आणि थंड वाटत होते.’
२. सौ. कीर्ती जाजडा
अ. ‘सद्गुरु पिंगळेकाकांची भेट होणार’, हे कळल्यावर मला ‘पर्वकाळात तीर्थाचे दर्शन होणार आहे’, असे वाटले.
आ. सद्गुरु काका बोलत असतांना माझ्या मनाला शांत वाटत होते आणि आनंद जाणवत होता. त्या वेळी मला शब्द कळत नव्हते; पण ‘माझे मन स्थिर झाले आहे’, असे मला जाणवले.
इ. सद्गुरु काकांचे चरण बघितल्यावर ‘ते गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण आहेत’, असे मला वाटले.’
३. सौ. दीपाली पोतदार
अ. ‘सद्गुरु पिंगळेकाका आणि सौ. पिंगळेकाकू (आधुनिक वैद्या (डॉ.) मधुवंती पिंगळे) दिग्रसला येणार आहेत’, हे कळल्यावर ‘सूर्यनारायण सपत्नीक रथात बसून येत आहे’, असे मला वाटत होते.
आ. सद्गुरु काकांचे मार्गदर्शन चालू असतांना त्यांच्या चरणांकडे पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्या वेळी ‘गुरुदेवच आले आहेत’, असे मला वाटत होते. सद्गुरु काकांच्या चरणांजवळ पांढरा प्रकाश जाणवत होता.
इ. सद्गुरु काकांचा चहा पिऊन झाल्यावर त्या कपात ‘ॐ’चा आकार उमटला होता.
ई. एक साधिका सौ. पिंगळेकाकूंच्या केसांत गजरा माळत असतांना ‘ती साक्षात् श्री भवानीदेवीला गजरा माळत आहे’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.
उ. ‘आपण देवाला किती सूक्ष्म स्तरावर कर्तेपणा अर्पण करायचा ? देव कसा ओळखावा ? कृतज्ञताभाव कसा असायला पाहिजे ?’ इत्यादी सूत्रे सद्गुरु काकांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळाली.’
४. सौ. नीता भगत
अ. ‘सद्गुरु काकांच्या वाणीत अद्भुत सामर्थ्य आहे. मला माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर प्रश्न न विचारताच त्यांच्या बोलण्यातून मिळत होते.
आ. साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना ते प्रत्येकाला आपलेसे करून घेत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.१.२०२६)
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !