आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !

आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !

जगद‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळा २८ जून २०२४ या दिवशी आणि प्रस्थान दुपारी २ वाजता पार पडणार आहे.

चैत्र एकादशीला पंढरपूर येथील दर्शनवारीत स्थानिक सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप !

केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्‍यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप होत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !

पायी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला, म्हणजे २९ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. १७ जुलैला आषाढी एकादशी असून ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी अस्वच्छ हौदाची स्थिती उघड करताच स्वयंसेवकांकडून तात्काळ स्वच्छता !

खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्‍यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

वारकर्‍यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,

माघ यात्रेसाठी पंढरपूर येथे अडीच लाखांहून अधिक वारकर्‍यांची उपस्थिती !

२० फेब्रुवारीला झालेल्या माघ यात्रेसाठी पंढरपूर वारकर्‍यांच्या उपस्थितीने भरून गेले असून यात्रेसाठी अडीच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित आहेत. या वारीसाठी गेल्या २ दिवसांपासून भाविकांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता.

अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी  शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.