रात्रीची झोप पूर्ण व्हायला हवी

‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास घरगुती उपाय

अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्‍याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्‍या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते.

बहुगुणी शेवग्‍याच्‍या झाडाची लागवड करा !

आताच्‍या काळात शेवग्‍याच्‍या फांद्या लावल्‍या, तर त्‍यांना मुळे फुटतात. आवश्‍यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्‍येकाने आपल्‍या परिसरात शेवग्‍याचे न्‍यूनतम एक झाड लावावे. आपत्‍काळासाठी हे झाड पुष्‍कळ उपयुक्‍त आहे.

ताप आलेला असतांना मोड आलेली कडधान्‍ये, दूध यांसारखा पचायला जड असलेला आहार टाळावा !

‘ताप आलेला असतांना सहजपणे पचणारा आहार हवा. मोड आलेली कडधान्‍ये, दूध, दही, काकडी, बटाटा, बीट, रताळी, सुरण यांसारख्‍या कंदभाज्‍या, फळे, तसेच विविध कोशिंबिरी हे सर्व पदार्थ पचायला जड असतात.’

प्रतिदिन शिळे अन्‍न खावे लागत असेल, तर जेवण थोडे अल्‍प बनवावे

नेहमी उरलेले अन्‍न शीतकपाटात ठेवून पुन्‍हा गरम करून जेवणे योग्‍य नव्‍हे. कधीतरी असे केल्‍यास चालू शकते; परंतु प्रतिदिन असे करू नये. एक वेळ अन्‍न थोडे कमी जेवल्‍यास चालू शकते; पण प्रतिदिन शिळे खाऊ नये. यासाठी आवश्‍यक तेवढेच अन्‍न बनवावे.

वर्षाचे बाराही मास मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिणे चुकीचे

उन्‍हाळा आणि शरद ऋतू सोडून अन्‍य वेळी मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिऊ नये. या काळात स्‍टील किंवा कलई केलेले तांबे-पितळ यांच्‍या भांड्यातील पाणी प्‍यावे.’

सोफ्‍याचा वापर पाहुण्‍यांसाठीच करावा !

‘घरात सोफा असला, तरी स्‍वतः त्‍यावर कधीही बसू नये. सोफ्‍याचा वापर केवळ पाहुण्‍यांना तात्‍पुरते बसण्‍यासाठी करावा. ज्‍यांच्‍याकडे सोफा नाही, त्‍यांनी हे विकतचे दुखणे घरी न आणलेलेच चांगले. त्‍याऐवजी खुर्च्‍या वापराव्‍यात.’

शिळी पोळी खाऊन ‘ब १२’ जीवनसत्त्व वाढते का ?

प्रतिदिन शिळे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नव्‍हे. नियमितपणे शिळे अन्‍न खाल्‍ल्‍याने शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात.

सकाळी उठून रस, लिंबू पाणी इत्‍यादी पिणे टाळावे !

‘प्रतिदिन सकाळी अमुक अमुक रस प्‍या’, ‘लिंबू पाणी प्‍या’ यांसारखे संदेश सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून आयुर्वेदाच्‍या नावाखाली प्रसारित होत असतात. बरेच जण असे करतही असतात. ‘हे आयुर्वेदिक उपचार आहेत.

‘डोळे येणे’ या विकारावर घरगुती उपचार

डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.