‘डोळे येणे’ या विकारावर घरगुती उपचार

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२३

‘डोळे आले असल्‍यास पुढीलप्रमाणे आहार आणि औषध करावे.

१. डोळे बरे होईपर्यंत नेहमीचा आहार न घेता मुगाच्‍या डाळीचे वरण आणि भात, मुगाच्‍या डाळीचे कढण (डाळ शिजवून तिच्‍यात चवीपुरता गूळ आणि मीठ घालून बनवलेला पातळ पदार्थ), रव्‍याचा उपमा किंवा शिरा, लापशी, मूगडाळ घालून बनवलेली तांदळाची खिचडी, भाकरी यांसारखा पचायला हलका आहार घ्‍यावा.

२. २ – २ चिमूट त्रिफळा चूर्ण दिवसातून ४ – ५ वेळा चघळून खावे.

३. डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.

४. डोळ्‍यांना लावलेले हात इतरत्र लावू नयेत. डोळ्‍यांना हात लावण्‍यापूर्वी आणि लावल्‍यानंतर हात साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत.

५. चिमूटभर भीमसेनी कापूर हातांच्‍या तळव्‍यांच्‍या मध्‍ये चोळावा आणि हाताचे तळवे डोळे उघडे ठेवून डोळ्‍यांच्‍या समोर जवळ धरावेत. तळवे डोळ्‍यांना टेकवू नयेत. या उपायाने डोळ्‍यांची जळजळ लगेच न्‍यून होते.

६. डोळे आले असतांना शक्‍यतो इतरांच्‍या संपर्कात येणे टाळावे. याने साथीचा प्रतिबंध होण्‍यास साहाय्‍य होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३)

(लवकरच या लेखांवर आधारित ग्रंथ प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan

सनातनचे त्रिफळा चूर्ण आणि भीमसेनी कापूर उपलब्‍ध आहे. प्रत्‍येक घरात १०० ग्रॅम त्रिफळा चूर्णाची, तसेच साधारण ९० ग्रॅम भीमसेनी कापराची प्रत्‍येकी एकेक डबी संग्रही ठेवावी. आपत्‍काळातही उपयोगी पडेल. घट्ट झाकण लावून ठेवलेले त्रिफळा चूर्ण आणि भीमसेनी कापूर ५ – ५ वर्षांनंतरही वापरता येतात.